Thursday 15 February 2018

महानगरपालिका आढावा

        महानगरपालिकेतील कामांचा राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नाशिक, दि.15 :-राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आज आढावा घेतला.
 यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, नगरसेवक दिनकर पाटील, गजानन शेलार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 याप्रसंगी त्यांनी रस्ते विकास, स्मार्ट सिटी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता आदी बाबींची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांनी सुरु असलेल्या कामांबद्दलच्या समस्या व अडचणींच्या अनुषंगाने सुचना केल्या.

 00000

No comments:

Post a Comment