Tuesday 15 August 2017

नामफलकाचे अनावरण

  नियोजित मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
 जागेच्या नामफलकाचे अनावरण


नाशिक, दि. 15 :- नाशिक विभागाच्या नियोजित मध्यवर्ती प्रशासकिय इमारत जागेच्या नामफलकाचे अनावरण राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच याठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, नगरसेविका प्रियंका घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  तसेच सर्व प्रमुख शासकिय अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाची विविध विभागीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत यासाठी प्रशासकीय इमारत त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी समोरील मोकळ्या भूखंडावर बांधण्यात येणार आहे.
                                                0000




No comments:

Post a Comment