Tuesday 15 August 2017

इन्फर्मेशन किऑस्कचे अनावरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते इन्फर्मेशन किऑस्कचे अनावरण

नाशिक दि.15- जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर स्थापित करण्यात येणाऱ्या इन्फर्मेशन किऑस्कचे अनावरण पालकमंत्री गिरीष महाजन हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात  करण्यात आले. किऑस्कच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास श्री.महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

 नागरिकांना संगणकीकृत सातबारासह इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील काही ठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रांच्या माध्यमातून विविध प्रकराचे दाखले, तहसील कार्यालयात मिळणाऱ्या नकलांच्या प्रती, आपले सरकार पोर्टलवरील सर्व सेवा, भारत सरकारच्या ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

डिजीटल इंडियाया महत्वाकांक्षी प्रकल्पास अनुसरून संगणकीकृत केलेल्या नमुना सातबाराचे वितरणदेखील श्री.महाजन यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच खातेदारांना करण्यात आले. जिल्ह्यात 12 लाख 18 हजार सातबाऱ्यांचे संगणीकीकरण झाले असून ते नागरिकांसाठी डिजीटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध झाले आहेत.

याच प्रकल्पांतर्गत सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप प्रिंटर देण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्प निधीतून प्राप्त झालेल्या 355 प्रिंटर्सचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

----

No comments:

Post a Comment