Saturday 21 January 2017

आचारसंहितेबाबत बैठक

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
                                                         - राधाकृष्णन बी.

नाशिक, दि. 21 :- निवडणूक प्रक्रीयेशी संबंधीत सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करून पारदर्शी पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हाधिाकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे, अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.

श्री. राधाकृष्णन म्हणाले, निवडणूकांमध्ये मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत विशेष दक्षता घ्यावी. निवडणुकीसाठी साधने, वाहने, साहित्य, कर्मचारी याबाबत पुर्वतयारी करण्यात यावी. अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण त्वरीत पुर्ण करून निवडणूक प्रक्रीयेचे नियोजन करण्यात यावे.
निवडणूकीतील गैरप्रकारांविरोधात तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. मतदारांना आकर्षित करण्यासाठी  उमेदवार नव्या क्लुप्त्या उपयोगात आणून पैसे ,वस्तु, मद्य याचा उपयोग करणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
निवडणूकीबाबत विविध परवाने देण्यासाठी एक खिडकी पद्धत राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.शिंदे यांनी आचारसंहितेच्या अंमजबजावणीबाबत पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी श्री. खेडकर यांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबत सादरीकरण केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी , पोलिस उपविभागीय अधिकारी, आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                                         00000

No comments:

Post a Comment