Tuesday 17 January 2017

सुरक्षा आहे लाभदायक-4


                                             सुरक्षा आहे लाभदायक-4
वाहन चालिवाताना वाहनाची देखभाल, सोबत बाळगावयाची कागदपत्रे, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबदेखील वाहनचालकाला माहिती असणे आवश्यक आहे. उपलब्ध तंत्रज्ञानाचा परिणामकारक उपयोग केल्यास अपघात टाळता येतील.
वाहन चालकाचे कर्तव्य
वाहनचालकाने  वाहनाची दैनंदिन देखभाल करावी. वाहनाचे डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी. वाहनाची इंधन गळती, ब्रेक कार्यक्षमता, टायर्सची स्थिती नियमीत तपासावी, योग्य लेनमधूनच प्रवास करावा.
वाहनासोबत बाळगावयाची कागदपत्रे
 वाहनाचे वैध प्रमाणपत्र, कर, विमा, परवाना, योग्यता प्रमाणपत्र, पीयुसी, चालकाचे लायसन्स व बँच इ. कागदपत्रे सोबत बाळगावी.
मोटार सायकल
 वाहन संशोधनाचा तुलनात्मक विचार केला तर असे दिसून येते की मोटार सायकलपेक्षा कार संदर्भात जास्त संशोधन होत आहे. आपल्या देशात नोंदणीकृत वाहनांमध्ये 70 टक्के वाहने मोटार सायकल वर्गातील आहेत व अपघातात त्यांचे प्रमाणही जास्त आहे. मोटार सायकल हे वाहन पूर्वी फक्त तरुण वर्गाचे म्हणून ओळखले जात होते. परंतू आता सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष त्याचा वापर करताना आढहतात.  मोटार सायकल चालविणे कठीण असते कारण एकाच वेळी वाहनाचा तोल सांभाळणे, शारीरिक हालचाली व एकाग्रता याचा समन्वय साधावा लागातो मोटार सायकल हे ‘Singal Track MV’ आहे. वाहनाचा आकार लहान असल्याने मोठ्या वाहनातील चालकाना सहज दिसून येत नाही.
अपघाताची कारणे
 वाहन चालवित असताना सतत दुसऱ्याला दोष देणारे व भांडणारे व्यक्तीमत्व, चुकीचे ओव्हरटेकींग, सिग्नल वारंवार तोडणे, वाहन आक्रमकपणे चालविणे, समवयस्कापेक्षा मी सुरक्षित आहे असे मानणे, अतिवेगात वाहन चालविणे, विनाकारण वाहन चालविणे, दारु पिऊन वाहन चालविणे, आपली क्षमता व कौशल्य इतरांपेक्षा जास्त आहे असे मानणे.
अपघात कसे टाळता येतील
 मोटार सायकल चालवताना पुढील वाहनापासून 2 सेकंदाचे अंतर ठेवावे व हेच अंतर रात्री, धुक्यात व पावसाळ्यात 3- 4 सेकंदाइतके असावे. वाहनाचा वेग वारंवार तपासावा जितका वेग जास्त तितके वाहन थांबविण्यास वेळ जास्त लागतो.ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूनेच करावे ओव्हरटेक करताना आरसा व दिशादर्शकचा वापर करावा. चौकात, वळणावर, पुढील रस्ता अदृश्य असेल तेव्हा आणि विशेषत: आपण द्विधा मनस्थितीत असाल  तेव्हा ओव्हरटेक करु  नये.

 वाहन थांबविताना दोन्ही ब्रेकचा वापा करावा. पुढच ब्रेक दाबतानाचार बोटांचा वापर करावा व वाहन सरळ रेषेतच असणे आवश्यक आहे. वळणावर वाहनाचा वेग कमीच असावा ज्यामुळे गाडी घसणार नाही. वळणावरती ब्रेक वापरु नयेत. ( पुढील ब्रेक तर अजिबात वापरु नये.) स्त्रियांनी दुचाकीवर बसताना पंजाबी ड्रेसच्या ओढणीची गाठ मारावी. तसेच साडीचा पदर निट खोचावा. दुचाकी चालविण्याच्या सुरुवातीलाच ओढणी किंवा साडीचा पदर याची नीट काळजी घ्यावी, ज्यायोगे तो चाकात अडकून अपघात होणार नाही. लेनची शिस्त पाळा, वळण्यापूर्वी इशारा करा. पाणी, वाहू, ऑईल सांडलेल्या रस्त्यावर वाहन  घसरु शकते. अशा वेळी कृपया आपले वाहन सावधानतेने चालवा. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी आहे, आपले वाहन त्यापूर्वीच थांबवा. वाहन विकत वाहनाचा आकार, रंगापेक्षा वाहनाच्या सुरक्षा यंत्रणावर भर द्या.
इंटेलिजन्स ट्रान्स्पोर्टेशन सिस्टिम
अद्ययावत सेन्सर्स, संगणक, माहिती व तंत्रज्ञान व वाहन व्यवस्थापन यांचा एकत्रित पद्धतीने उपयोग केल्यास रत्याची सुरक्षितता, कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढविता येईल.  ‘आयटीएस’मुळे वेळेची, इंधनाची, व्यवस्थापना खर्चाची बचत व वाहतुकीची कोंडी कमी होते. रस्त्याची कार्यक्षमता व हवेची गुणवत्ता वाढवते. रस्त्यांची सुरक्षितता व कार्यक्षमता वाढते. भविष्यातील वाहतुकीचे नियोजन व रस्ते विकासास उपयोगी. प्रवाशांना माहिती, वाहतुक नियंत्रण, अपघाताची माहिती, टोल व्यवस्थापन व्यावसायिक वाहनांवरती नियंत्रण व नियमन , ताफा (Fleet) व्यवस्थापन  शक्य होते.

क्रमश:

No comments:

Post a Comment