Monday 16 January 2017

सुरक्षा आहे लाभदायक-1

सुरक्षा आहे लाभदायक-1
राज्यात रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी 28 वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. ‘अपघात आहे दु:खदायक, सुरक्षा आहे लाभदायक’ हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. जनजागृतीच्या माध्यमातून अपघातांची संख्या कमी करणे अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. अभियानाच्या निमित्ताने वाहतूकीच्या नियमांबाबत माहिती-
पृथ्वीतलावर देशाच्या सीमेपेक्षा धोकादायक जागा कोणती असेल तर ती म्हणजे जमीनवरचे काळे पट्टे,  ज्याला आपण  रस्ता म्हणतो.  या रस्त्यांवर वाहनांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी जणू धोकेदायक स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे अपघात घडतात आणि अनेकदा वाहनचालक किंवा प्रवाशांना जीव गमवावा लागतो. यागोष्टीची तीव्रता कमी करावयाची असेलत तर ‘E’ सुरक्षा आवश्यक आहे.
 Education
 Engineening
 Enforcement
 Encouragement
 Emergency Medical
EDUCATION (शिक्षण)
नवशिक्या वाहन चालकास अनुभवी व कुशल व्यक्तीने शेजारी बसून शिकविल्यास त खऱ्या अर्थाने   उच्च दर्जाचे प्रशिक्षण होईल.
रस्त्यावरील वाहतुकीचे चिन्हे
          शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यावरील प्रत्येक घटकांची हालचाल सुरक्षित, कार्यक्षम होण्याकरिता चिन्हांचा वापर केला जातो. ही चिन्हे सांकेतीक असल्याने आपले लक्ष वेधतात  व त्यांचा बोध होतो. भाषेची अडचण होत नाही आणि लांबूनही आकर्षीत करतात. सदर चिन्हांतून दिलेल्या सुचनांचे पालन आपल्या व इतर पादचारी, वाहन चालकाच्या फायद्याचेच आहेत. ही चिन्हे रस्त्याच्या डाव्या बाजूस असतात. यांचा आकार त्रिकोणी , आयाताकृती, अष्टकोनी किंवा गोलाकार असतात.
रस्त्यावरील खुणा/पट्टे
          वाहतुक सुरक्षित, शिस्तशीर, सोयीची, कार्यक्षम होण्याकरिता  रस्त्यावर पट्टे / रेषांचा वापर केला जातो. सदर रेषा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. पांढरा रंग आपल्याला सावध करतो, वाहन मार्ग दर्शवितो,  तर पिवळा रंग प्रतिबंधात्मक आदेश करत असतो. रस्त्यावरील अडथळे, वस्तू किंवा किनार पांढऱ्या, काळ्या व पिवळ्या रंगाने रंगवलेल्या असतात.                              
रस्त्याच्या  मध्यभागी तुटक तुटक पांढरी रेष असते, याचा अर्थ पुढील वाहनाच्या पुढे जाण्यास अधिकार आहे. म्हणजेचे ओव्हरटेक करता येते. रस्त्याचे मध्यभागी जेव्हा एक अखंड पांढरी रेषा मारलेली असते तेव्हा पुढील वाहनाच्या पुढे जाण्यास मनाई, म्हणजेच ओव्हरटेक करण्यास मनाई असते. रस्त्याच्या मध्यभागी एक अखंड पांढरी रेषा व त्या रेषेलगत एक तुटक तुटक पांढरी रेषा असते. याचा अर्थ  ज्या बाजूने तुटक रेषा आहे त्या बाजूने ओव्हरटेक करता येईल. ज्या बाजूने अखंड रेषा असते त्या बाजूने ओव्हरटेक करण्यास मनाई असते. रस्त्याच्या मध्यभागी जेव्हा दोन समांतर अखंड पांढऱ्या रेषा मारलेल्या असतात. त्याचा अर्थ दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांना पुढील वाहनाच्या पुढे जाण्यास मनाई असते. तसेच रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहन उभे करण्यास मनाई असते. पादचारी मार्गालगत पहिला पांढऱ्या पट्टयाजवळ वाहन थांबवावे आणि वाहतुक  बेटामध्ये असलेल्या वाहनांना प्राध्यान्य द्यावे.
रस्त्यावर पहिला हक्क कोणाचा ?
पादचाऱ्यांचा
काट रस्त्यावर मोठ्या रस्त्यावरील वाहनांचा
वाहतुक बेटात जवळील वाहनांचा
आपल्या उजवीकडील वाहनांचा असतो.
चौक पार करताना घ्यावयाची काळजी-
 वेगावर नियंत्रण ठेवा
समोरील वाहनांना प्राधान्य
 योग्य मर्गिकेची निवड
 थांबा, पहा व नंरच पुढे जा
क्रमश:

No comments:

Post a Comment