Monday 16 January 2017

सुरक्षा आहे लाभदायक-3

सुरक्षा आहे लाभदायक-3
मद्यप्राशन करून वाहन चालवितांना अनेकदा अपघात होतात. यात वाहन चालविणाऱ्याबरोबरच सामान्य प्रवाशांनादेखील जीव गमवावा लागतो. तसेच वेगवेगळ्या मार्गावरून वाहन चालवताना सावधानी बाळगावी लागते. त्याविषयीची माहिती वाहन चालकाला असणे आवश्यक आहे.
मद्यप्राशन
मद्यप्राशन करुन वाहन चालवणे गंभीर गुन्हा आहे. अशा परिस्थीतीत आपले लायसन्स रद्द, निलंबित केले जाते आणि न्यायलयीन कार्यवाहीस सामोरे जावे लागते. मद्यामुळे गुंगी येते, तरतरी नाही. मद्याचा अंमल फक्त काळच कमी करु शकतो.
घाटात वाहन चालवितांना घ्यावयाची खबरदारी
 वाहन खालच्या गिअरमध्ये चालवा. घाट चढतान ज्या गिरमध्ये वाहन चालवता त्याच गिअरमध्ये उतरा. घाट चढणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्या. घाटात दिवसा हॉर्न व रात्री दिव्यांचा उपयोग स्वत:चे अस्तित्व दाखविण्याकरिता करा. घाटात वाहन थांबवणे गरजचे असल्यास वाहन उभे केल्यास वाहतुकीला अडथळा होणार नाही ‍ याची खात्री करा. हातरोधक लावा व लाकडी ठोकळ्यांचा ( उटीचा) वापर करा.
पावसाळयात घ्यावयाची दक्षता
पावसाळ्यात वाहन चालविताना टायर चांगल्या स्थितीत असावेत. वायपर चालू असल्याची खात्री करा. ब्रेक व्यवस्थित असणे आवश्यक आहे. साठलेल्या पाण्यातून गाडी गेल्यावर ब्रेक लायनर गरम होण्यासाठी थोडा ब्रेकचा वापर करा. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा व खोलीचा अंदाज येत नसताना पाण्यात वाहन नेऊ नका.  काचेवर बाष्प साचू न देण्यासाठी ए./सी. वापरावा किंवा काचा थोड्याशा उघड्या ठेऊन अधुन-मधून काचा कपड्याने पुसून घ्याव्यात. वाहन चालवत असताना रस्त्यावर साचलेले पाणी दुसऱ्यांच्या अंगावर उडणार नाही याची देखील काळजी घ्या.
सीट बेल्टचे फायदे-
 सीटबेल्ट वापरणे चांगली सवय आहे. सीटबेल्ट वापरणे कायद्यानेदेखील  बंधनकारक आहे सीटबेल्टमुळे दुदैवाने वाहनाची धडक झाल्यास डोके स्टेअरिंगवर आपटत नाही. सीटबेल्टमुळे आपण वाहनामध्ये स्थिर राहतो व वाहनावर पूर्ण नियंत्रण राहण्यास मदत होते. धडकेमध्ये बाहेर फेकले जाण्याची शक्यता उरत नाही.
हेल्मेट (शिरस्त्राण)  वापरण्याचे फायदे
दुचाकी वापरताना हेल्मेट वापरणे ही चांगली सवय आहे. अपघाताच्यावेळी त्यामुळे जीवाला हानी होत नाही.  हेल्मेट  ‘आयएसआय’ मार्कचे असावे. हेल्मेट हलक्या व चमकदार रंगाचे असावे. हेल्मेटला मागील बाजूस रेडियम पट्टी चिटकवा. हेल्मेटचे आयुष्यमान 4-5 वर्षाचे असते. हेल्मेटमुळे कोणताही शारीरिक आजर होत नाही. अपघात झाल्यास डोक्याला इजा होत नाही. अथवा, मेंदूपर्यत इजा पोहचण्याची कमीत कमी शक्यता असते. धडक बसल्यानंतर जिवीत हानी टळण्याची शक्यता शतपटीने वाढते.

क्रमश:

No comments:

Post a Comment