Tuesday 17 January 2017

मतदारांना आवाहन

                                विधान परिषद  निवडणूकी संदर्भात मतदारांना आवाहन
       नाशिक, दि. 18 :- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीचे मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने मतदारांना मतदान करण्याबाबत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान अधिकारी क्र. 3 यांचे कडून मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मतदान करावे. याशिवाय इतर पेन,पेन्सिल,बॉल पाँईंट पेन वापरू नये. अन्यथा मतपत्रिका रद्द होऊ शकते. मतदान पसंती क्रमांकानुसार असल्याने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्र.1 लिहून मतदान करावे. 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा.
मतपत्रिकेवर निवडणूक लढवित असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम नमूद करावयाचा आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासमोर मतदार त्याच्या निवडीनुसार पसंतीक्रम (अंकामध्ये) नमूद करू शकतो. मतपत्रिकेवर जेवढे उमेदवार नमूद आहेत त्या सर्व उमेदवारांना मतदाराच्या पसंतीक्रमानुसार 1,2,3,4,5,6...... याप्रमाणे जेवढे उमेदवार निवडणुकीकरीता उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना पसंतीनुसार मतदान करता येईल. NOTA चा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
मतपत्रिकेवर नमूद करावयाचा पसंतीक्रम फक्त अंकांमध्येच (मराठी देवनागरी, इंग्रजी, रोमन .)नमूद करावयाचा आहे. सदर पसंतीक्रम शब्दात लिहिल्यास मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवर कोठेही सही करून नका किंवा आपले नाव किंवा इतर अक्षरे लिहू नका. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसादेखील उमटवू नका अन्यथा मतपत्रिका बाद होईल. आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे X असे करू नये.अन्यथा मतपत्रिका बाद होईल. मतदारास आपला पहिला पसंतीक्रम (1) नमूद करणे आवश्यक आहे.
पहिला पसंती क्रम नमूद केल्यास किंवा पहिला पसंती क्रम एकापेक्षा जास्त उमेदवारांचे नाव पुढे दर्शविल्यास मतपत्रिका बाद होते. कोणत्या उमेदवारास पसंती क्रम नोंदविला आहे याचा बोध   झाल्यास, एकाच उमेदवाराच्या नावासमोर सर्व पसंतीक्रम दर्शविल्यास, पसंतीक्रम अंकी दर्शविता अक्षरी दर्शविला असल्यास, मतदाराची ओळख पटेल अशा रितीने मतपत्रिकेवर चिन्ह अथवा मजकूर नमूद असल्यास आणि मतदान अधिकारऱ्याने पूरविलेल्या जांभळ्या स्केचपेन शिवाय इतर साधनांचा वापर करून पसंतीक्रम दर्शविल्यास  मतपत्रिका बाद होते.
मतदारांनी या सुचनांचे काटोकोरपणे पालन करून योग्य पद्धतीने मतदान करावे,असे  सहा. निवडणूक  निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधरमतदार संघ  यांनी केले आहे.
                                                       ----

No comments:

Post a Comment