Monday 2 January 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
नाशिक दि.2: प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 राज्यातील सर्व जिल्ह्यात अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून 10 जानेवारी 2017 अशी करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी नॅशन इन्शुरन्स कं.लि. यांचे जिल्हानिहाय प्रतिनिधी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी आणि जवळील बँकेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधीक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

-----

No comments:

Post a Comment