Monday 16 January 2017

सुरक्षा आहे लाभदायक-2

सुरक्षा आहे लाभदायक-2
          रस्ता सुरक्षेचा विचार करताना रस्त्यावरून वाहन चालविण्याबाबत विविध नियम किंवा संकेत महत्वाचे असतात. त्याचबरोबर वाहन रस्त्याच्या कडेला अथवा वाहनतळावर उभे करताना काही बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
पार्किगसाठी प्रतिबंधक
 पार्किगसाठी मनाई असलेल्या ठिकाणी वाहन उभे केल्यास इतरांना अडथळा होतो. तसेच वाहतुकीस  धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी उभे केलेली वाहने वाहतुक पोलीस किंवा महापालिका अतिक्रमण विभाग ओढून नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेऊ शकातात किंवा क्लॅम्प लावून वाहन अटकावून ठेऊ शकतात.
ओव्हरटेक करताना काय करावे ?
ओव्हरटेक करताना रस्त्यावर तशी परवानगी असल्याची खात्री करा. आपल्या वाहनाच्या पुढील, मागील व समोरील वाहनाची लांबी लक्षात घ्या. आपल्या मागचा ओव्हरटेक करतोय का ते पहा, इशारा करा, मागील वाहन आपल्या आरशात दिसल्यावर लेन बदलून ओव्हरटेक करण्यास सुरुवात करा.
खालील ठिकाणी ओव्हरटेक करु नका !
 झेब्रा क्रॉसिंगवर, चौकामध्ये, वळणावर, रेल्वे फाटकावर, उंचवटावर, रस्ता अरुंद असेल तर, मागील वाहन ओव्हरटेक करत असेल तर किंवा आपण द्विधा मनस्थितीत असाल तर ओव्हरटेक करू नका.
गाडी सोडून जाताना
 गाडी सोडून जाताना इंजिन बंद करा. हॅन्ड ब्रेक लावा,  गाडी गिअरमध्ये ठेवा. सपाट रस्ता व चढावर पहिल्या गिअरमध्ये आणि उतारावर रिव्हर्स गिअरमध्ये पार्क करा. गाडी योग्य ठिकाणी पार्क करा. चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या वाहनाला किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे पार्किग करु नका. गाडी लॉक केली असल्याची खात्री करा.
रात्री वाहन चालवत असताना –
 वाहनासोबत राखीव दिवे ( Spare Bulb)  बाळगा. वाहनाचे दिवे सुर्योदयानंतर अर्धा तास व सुर्यास्तापूर्वी अर्धा तास  या कालावधीत दिवे चालू ठेवणे बंधनकारक आहे.  रस्त्यावरील बंद पडलेली वाहने रात्रीच्या अंधारात दिसून येत नाहीत. बंद  वाहनाच्या अलीकडेच लाल परावर्तक त्रिकोण ठेवला पाहिजे.  समोरील वाहन आपल्या टप्प्यात आल्यानंतर त्यास डीप्पर वापरण्याचा इशारा करा.  वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे डोळ दिपून जाता, हे टाळण्यासाठी  ‘रस्त्याची कड’ बघा.  वाहनातील वजनाप्रमाणे प्रकाशझोत ॲडजेस्ट करा. रात्री वाहन रस्त्यावर उभे करावयाचे असेल तर  ‘Hazard Warning Sigal’ चे दिवे लावा. वाहन वळवताना डिपराचा वापर करा. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळवा.  प्रवासपूर्वी पुरेशी विश्रांती घेऊन मगच प्रवास करा.

क्रमश:

No comments:

Post a Comment