Tuesday 31 January 2017

मतमोजणी पूर्वतयारीचा आढावा

पदवीधर निवडणूक मतमोजणी व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

नाशिक दि.: विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची मतमोजणी अंबड औद्योगिक वसहतीतील सेंट्रल वेअर हाऊसींग कॉर्पोरेशन येथे होणार असून विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी मतमोजणी व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपआयुक्त संजय कोलते, ज्ञानेश्वर खिल्लारी, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार एस.डी.मोहिते, गणेश राठोड आदी उपस्थित होते.

श्री.डवले यांनी परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा करण्याच्या सुचना दिल्या. मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे योग्यपणे पालन होईल तसेच या कालावधीत अखंड विद्युत पुरवठा राहील याची दक्षता घेण्यात यावी , असे त्यांनी यावेळी सांगितले.   त्यांनी सुरक्षा व्यवस्था, मतमोजणीसाठी बैठक व्यवस्था, मिडिया सेंटर आदी बाबींचा आढावा घेतला.
यावेळी पोलीस, महावितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी आदी विविध  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment