Friday 5 August 2016


सार्वजनिक उत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी आवश्यक
          नाशिक दि.5:- सार्वजनिकरित्या साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिकलम 1950 च्या उपकलम 41 अ अन्वये धर्मादाय उपायुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
          जनतेच्या सोयीसाठी यावर्षीपासून  अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे.  यासाठी  https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली  आहे.
अर्ज सादर करताना सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव, सदस्यांच्या ओळखपत्राची प्रत, जागा मालकाचे परवानगी पत्र, प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे सदस्यांच्या ओळखीबाबतचे पत्र, मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशोब, आणि मागील वर्षी घेतलेल्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत  सादर करणे आवश्यक आहे.
          अर्ज प्राप्त झाल्यानंतर धर्मादाय उपआयुक्त यांचेमार्फत योग्य ती चौकशी करून वर्गणी गोळा करण्यास परवानगी देण्यात येईल. परवानगी न घेता वर्गणी घेतल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. संबंधितांनी अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी, असे धर्मादाय उपआयुक्त राहुल मामू यांनी कळविले आहे.  
0000000000

No comments:

Post a Comment