Friday 4 January 2019

उपकेंद्र उद्घाटन


    सायने टेक्सटाईल पार्क उपकेंद्राचे दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन

         मालेगाव,दि.4 - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत 33/11 के. व्ही. सायने बु. टेक्सटाईल पार्क उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
 श्री.भुसे यावेळी म्हणाले,   उपकेंद्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वीज वितरण शक्य होईल. मालेगाव परिसरातील उद्योग विकासासाठी उपकेंद्र उपयुक्त ठरु शकेल. वीज उपलब्धतेमुळे औद्योगिक वसाहतीकडे उद्योजक अधिक प्रमाणात आकर्षित होतील. उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मागणीनुसार त्यांना तातडीने वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वीज गळती  थांबावी यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

उपकेंद्रामुळे सायने, पवारवाडी, दरेगाव या परिसरातील गावांना फायदा होणार असून त्याचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल असे आमदार शेख आसिफ शेख रशिद यांनी  सांगितले.

कार्यक्रमाला उपमहापौर सखाराम घोडके, मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ ब्रिजपालसिंह जनवीर, प्र.अधीक्षक अभियंता संदिप दरवडे, अधिक्षक अभियंता संजय खंदारे, कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे  तसेच नगरसेवक व सायने शिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपकेंद्राच्या निर्मितीसाठी  अडीच कोटी रुपये खर्च आला असून मे 2020 पर्यंत सर्वाना वीज जोडणी  देणात येणार असल्याची माहिती  श्री.जनवीर यांनी दिली.
33 / 11 के. व्ही. संगमेश्वर उपकेंद्राचे भूमीपूजन

33/11 के.व्ही. संगमेश्वर कलेक्टर पट्टा नवी वस्ती उपकेंद्राचे भूमीपूजन श्री. भुसे यांच्या हस्ते कोनाशिला अनावरणाद्वारे करण्यात आले
यावेळी बोलताना ते म्हणाले, या उपकेंद्राच्या माध्यमतून पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होणार असून येणाऱ्या 6 महिन्याच्या आत उपकेंद्राचे  काम पूर्ण होणार आहे. याचा लाभ परिसरातील नागरिकांना होईल. येत्या काळात भूमीगत केबलचे काम होणार असून रस्त्यामधील वीजेचे पोल व डीपीचे योग्य जागी स्थलांतर करण्यात येणार आहे.
उच्च दाब वाहिनीमुळे शेतकरी व नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज टॉवरचे योग्य जागी स्थलांतर करावे, अशा सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या.  
                                        *************    

No comments:

Post a Comment