Saturday 1 July 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण

जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नाशिक, दि. 1: चार कोटी वृक्ष  लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जमाबंदी आुयक्त एस.चोकलिंगम आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे, तहसीलदार सी.एस. देशमुख, शरद घोरपडे आदी उपस्थित होते.
वन हक्क कायदा कक्षातर्फे सामुहिक वनहक्क क्षेत्रात लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचादेखील श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पेसा अंतर्गत गावात पाच लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने फळझाडांचा समावेश आहे.

----

No comments:

Post a Comment