Saturday 1 July 2017

चार कोटी वृक्ष लागवड शुभारंभ

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
बोरटेंभे येथे जिल्हास्तरीय वृक्ष लागवडीचा शुभारंभ

नाशिक, दि. 1: राज्य शासनातर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान आयेजित चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हस्तरीय वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथे करण्यात आला.

यावेळी मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, सहाय्यक वनसंरक्षक आरटी मकदूम,  बाबासाहेब जेजुरकर, नगरसेवक अजीज खान, यशवंत दळवी आदी उपस्थित होते.

बोरटेंभे येथे 25 हेक्टर क्षेत्रात 27 हजार 500 रोपे लागवड करण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा, सामाजिक संस्था आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ह्युमॅनिटी हेल्थ फाऊंडेशन, के.के. वाघ इंजिनिअरींग कॉलेज, इगतपुरी येथील जनता विद्यालय आणि टाके येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

-----

No comments:

Post a Comment