Thursday 13 April 2017

कृषी उत्पन्न बाजार समिती बैठक

परवाने नुतनीकरणाच्या प्रकियेत पारदर्शकता ठेवा -सुभाष देशमुख

नाशिक दि.13 - कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण करण्याच्या प्रक्रीयेत पारदर्शता ठेवावी आणि व्यापाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे मागवून नुतनीकरण प्रक्रीया वेळेत पुर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
विभागीय निबंधक कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, विभागीय सहकार सहनिबंधक ए.डी.भालेराव, एम.डी.पाटील, उपनिबंधक दिंगबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आदी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले, बाजार समिती शुल्क (सेस) चुकविणाऱ्या किंवा कादपत्रांची पुर्तता न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुतनीकरण करण्यात येऊ नये. मात्र प्रामाणिक व्यापाऱ्यांना या प्रक्रीयेत त्रास होणार नाही याचीदेखील दक्षता घेण्यात यावी. कागदपत्रे न  सादर करणाऱ्यांना नोटीस देऊन अखेरची संधी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या सुचनांचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांचे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---

No comments:

Post a Comment