Thursday 13 April 2017

सहकार विभाग बैठक

सहकारी संस्थांच्या नवीन व्यवसायांसाठी प्रोत्साहन - सुभाष देशमुख

नाशिक दि.13 –सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील गरजा ओळखून नवीन व्यवसायांना सुरुवात करणे गरजेचे असून त्यासाठी अटल महापणन विकास अभियानाद्वारे नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
सहकार विभागाच्या नाशिक विभागस्तरीय आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. विभागीय सहकार सहनिबंधक ए.डी.भालेराव, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जयसिंग ठाकूर, विशाल जाधवर, बैठकीस विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील,आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या व्यवसायांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. यासाठी राज्यातील 22 हजार सहकारी संस्थांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास लाखो त्यांचा अनेकांना  लाभ होईल. गावातील व्यवसायामुळे गावातला पैसा गावातच राहिल आणि गावाच्या विकासासाठी उपयोगात येईल. वैभवशाली राष्ट्र उभारताना वैभवशाली गावे निर्माण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सहकार विभागाचे जाळे गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची आवश्यकता आहेचांगल्या सहकारी संस्थांच्या मजबूतीसाठी आणि विकासासाठी शासनाच्यावतीने पुढच्या काळात विविध कामे करण्यात येणार असून व्यवसायांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येतीलएमसीडीसीराज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने थेट कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे सहकार मंत्री म्हणाले.

सहनिबंधक श्री.भालेराव यांनी नाशिक विभागातील कामाचा आढावा यावेळी सादर केलाविभागातील संस्थांनी 1 लाख 35 हजार नवीन सभासदांची नोंदणी केली असून बचतगटांना प्रोत्साहन देण्याच्या अभियानांतर्गत नवीन 40 व्यवसायांची सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणालेयाप्रसंगी जिल्हा उप निबंधक नाशिकधुळेजळगाव यांनी जिल्हास्तरीय आढावा सादर केला.
बैठकीत अटल महापणन अभियानांतर्गत चांगल्या कामाबद्दल सुरगाणा आदिवासी विकास संस्था(तांदूळ व्यवसाय),राजापूर सहकारी विविध विकास सोसायटी,दिंडोरी(शेती औजारे),वडनेर भैरव स.वि.संस्था(कृषी औषधे), हिरकणी बचतगटकृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक(उपहारगृह), रानवड वि.का..संस्था निफाड(हार्डवेअरआदीं संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
---

No comments:

Post a Comment