Tuesday 11 April 2017

‘मेक इन नाशिक’

नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी मेक इन नाशिक’- गिरीष महाजन

       मुंबई, दि. 11 : ‘मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील उद्योगवाढ व विकासासाठी मेक इन नाशिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे सांगितले.
          मंत्रालयात आयोजित मेक इन नाशिक संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार हेमंत टकले, बाळासाहेब सानप, श्रीमती देवयानी फरांदे, नाशिकच्या महापौर श्रीमती रंजनाताई भानसी, उपमहापौर प्रथमेश गते, निमाचे अध्यक्ष एच.एन.बॅनर्जी, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी व्यवस्थापक राजेंद्र अहिरवार, प्रादेशिक अधिकारी वंदना पाटील, निमाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या फ्लॅग प कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मेक इन महाराष्ट्र च्या माध्यमातून उद्योजकांना गुंतवणूकीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, पुणे शहराबरोबर नाशिक जिल्ह्याचा देखील विकास व्हावा, याकरिता मेक इन नाशिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
            श्री. महाजन म्हणाले की, रामदेवबाबाचे पतंजली हब, जिंदाल इंडस्ट्रीज, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा या प्रमुख तीन कंपन्यांना प्राधान्य देऊन नाशिक येथे गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कंपन्यांशी समन्वय साधून या कंपन्यांना गुंतवणूकीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.उद्योजकांना गूंतवणूकीसाठी उद्योग मंत्रालयाशी समन्वय साधून गुंतवणूकीसाठी उद्योजकांना कसे आकर्षित करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
            नेहरु सेंटर, मुंबई येथे दिनांक 30  31 मे, 2017 रोजी मेक इन नाशिक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाशिक शहरामध्ये मोठे उद्योजक, लघ उद्योजक येणार असून नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधा प्रदर्शित करण्यात येणार आहे. नाशिकच्या विकासाला चालना मिळावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.
            उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले की, एमआयडीसीअंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना योग्य त्या पायाभूत सोयी-सुविधासह एक स्टॉल उभारुन त्या उद्योजकांना नवीन काही सोयी-सुविधा असतील त्या देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.तसेच उद्योजकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमत्रित केले जाईल. मेक इन इंडिया अंतर्गत करार झालेले आहेत, त्या अंतर्गत गुंतवणूकीसाठी तयार असलेले उद्योजकांची माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात येणा-या सूचनांचा विचार करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            स्थानिक आमदारांनी देखील आमदार निधीद्वारे या उपक्रमास निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.
०००००


No comments:

Post a Comment