Monday 2 October 2017

स्वच्छता मोहिम

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिमेचे आयोजन

नाशिक दि. 2:-जिल्हाधिकारी  कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत परिसरात गवत, झुडुपे आणि कचरा स्वच्छ करण्यात आला.

          निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसिलदार चंद्रशेखर देशमुख, शरद घोरपडे, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालातील अधिकारी-कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य आदींनी मोहिमेत सहभाग घेतला.

          यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी शहराला लाभलेले सौंदर्य कायम राखण्यासाठी स्वच्छता राखण्याचे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी स्वच्छतेची सवय ठेवल्यास शहर स्वच्छ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

          श्री.खेडकर यांनी स्वच्छता एका दिवसापुरती मर्यादीत न ठेवता रोजच्या जीवनातील एक भाग म्हणून स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले. मोहिमेअंतर्गत चार घंटागाडी भरून कचरा स्वच्छ करण्यात आला.

          जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

----

No comments:

Post a Comment