Friday 1 March 2019

मतदार जनजागृती


नवमतदारांचा मतदार यादीत समावेश करावा- विभागीय आयुक्त


नाशिक दि.2- मतदार यादी परिपूर्ण करण्यासाठी बीएलओ यांनी विशेष प्रयत्न करुन नवमतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.
 युथ एज्युकेशन व वेलफेअर सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत आयोजित  मतदार जनजागृती व मतदार नोंदणी विषयक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपायुक्त रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, युथ एज्युकेशन संस्थेचे सचिव राहित शेख आदी उपस्थित होते.

 श्री. माने म्हणाले, सर्व पात्र मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी नवमतदार तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी. त्याचप्रमाणे मतदार नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेमध्ये वंचित राहिलेल्या नगारिकांनी नोंदणी करुन मतदार प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. लोकशाहीला भक्कम करण्यासाठी नवतरुण मतदारांनी पुढे येऊन मतदार नोंदणी करावी.

मतदान केंद्र व मतदान केंद्राची जागा निश्चित करतांना दिव्यांग मतदारांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात ज्यामुळे दिव्यांगाना मतदान करणे सोईचे होईल. त्याचप्रमाणे महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बीएलओ यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

यावेळी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी युथ एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या तेरा मतदान केंद्राची पाहणी केली.
***********

No comments:

Post a Comment