Tuesday, 15 August 2017

हेल्मेट जनजागृती रॅली

हेल्मेट जनजागृती रॅलीमध्ये पालकमंत्र्यांचा सहभाग


नाशिक, दि. 15 :- रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर प्राधान्याने करावा असा संदेश देणाऱ्या हेल्मेट जनजागृती रॅलीचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला.
पोलीस कवायात मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल,  पोलिस उपायुक्त पाटील, शासकिय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, मोटार सायकल रायडींग क्लब, विविध संस्था, नागरीक  तसेच सर्व प्रमुख शासकिय अधिकारी उपस्थित होते.

 दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने  आयोजित या रॅलीचा पोलिस कवायत मैदान, गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड मार्गे गोल्फ क्लबवर समारोप झाला

                                                0000

No comments:

Post a Comment